

📕 पृष्ठसंख्या : 272
✔️ साईज : मोठा आकार 1/4 सेमी (8.5 x 11")
✔️ कागद व छपाई : आर्ट पेपर, मल्टिकलर,
✔️ भाषा : मराठी, हिन्दी, इंग्रजी तिन्ही भाषेत उपलब्ध
💸 किंमत : रु. 2100/-
✔️ प्रकाशनपूर्व सवलतीमध्ये : रु. 1500/- (घरपोच मिळेल)
📅 प्रकाशन : 30 जुलै 2025
📅 प्रकाशन पूर्व नोंदणी सवलत : 15 जुलै 2025 पर्यंत

ही कहाणी आहे, अखंड भारतातील एक प्राचीन देशाची... प्राचीन कंबूज देशांची (आजचा कंबोडिया) दोन हजार वर्षांपासून सुरू असलेल्या भारत कंबोडियाच्या सांस्कृतिक प्रवासाची... दक्षिण भारतातील एक कौण्डिण्य नावाचा युवक इ. स. च्या पहिल्या शतकामध्ये कंबूज भूमीवर प्रथम पाऊल ठेवतो आणि तेथे संस्कृती आणि सभ्यता यांचे बीजारोपण करतो.. तेथून बहरत जाणारी ही प्राचीन संस्कृती.... तेथील हिंदू सम्राट फुनान, चेन-ला, ख्मेर हे दक्षिण भारतातील राजवंशाबरोबर नातेसंबंध असलेल्या राजवंशातील राजे आणि त्यांनी निर्माण केलेली जगविख्यात मंदिरस्थापत्ये ... अंगकोरवाट, बयॉन, अंगकोरथॉम, बांटीश्री, ता- प्रोम, निक पिऑन, प्रा-रूप, प्री-हखा, बाखेंग, बकाँग, बांटी कडाई अशी शेकड्याने नव्हे तर हजारो मंदिरे स्थापत्ये... जेव्हा लंडन, पॅरिस येथे काही शेकडा लोक रहात होते, तेव्हा अंगकोरवाट येथे दहा लाखांहून अधिक लोकांची सभ्यता आणि संस्कृती सुखाने नांदत होती... गेल्या दोन हजार वर्षांचा कंबुज संस्कृतीचा वेध घेण्याचा प्रामाणिक प्रयन लेखकाने या ग्रंथामध्ये केला आहे. त्यासाठी वीसहून अधिक वेळा त्याने कंबोडिया मध्ये प्रत्यक्ष वास्तव्य केले आहे. एक कोटी भारतीयांना अंगकोरवाट दाखवण्याचे भव्य स्वप्न त्यांनी उराशी बाळगले आहे. प्राचीन कंबुज देशाबरोबरच आजच्या कंबोडियाचे इत्यंभूत वर्णन या ग्रंथामध्ये आहे. तसेच कंबोडिया टूर कशी करायची, त्याचे नियोजन, त्यासाठी येणारा खर्च याची सविस्तर माहिती या ग्रंथामध्ये आहे. ग्रंथाची अत्यंत आकर्षक मांडणी, ओघवती भाषा शैली आणि सप्तरंगी फोटो यांनी आपल्याला अंगकोरवाटचे जणू काही प्रत्यक्ष दर्शन घडते आणि कधी एकदा अंगकोरवाटला जाऊ अशी मनाला हूरहूर लागते... प्राचीन भारतीयांच्या साहसाचा, विद्वतेचा, विज्ञानाचा आणि पराक्रमांचा, प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारा, आपल्या प्राचीन संस्कृतीचा अभिमान जागवणारा, प्रत्येक भारतीयाने वाचला पाहिजे असा हा अनमोल ठेवा... म्हणजे हा अंगकोरवाट विष्णुधाम कंबोडिया हा ग्रंथ आहे.

वरील बटन क्लिक करुन पुस्तकाची ऑनलाईन नोंदणी करा.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुस्तक आपल्याला घरपोच मिळेल.
Payment Options: All Debit / Credit Cards / Int Banking / UPI Apps / Wallets


![]() | ![]() |
---|---|
![]() | ![]() |

पुस्तकाची माहिती व्हॉट्सअॅपवर मागवण्यासाठी 9503864401 या क्रमांकावर Angkor Book असा मेसेज पाठवा.
चौकशी / माहितीसाठी संपर्क
मोबाईल : 7507207645 / व्हॉट्सअॅप: 9503864401
ईमेल: bhishmaprakashan@gmail.com
कार्यालय : भीष्म प्रकाशन
६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, झेड ब्रिज जवळ, हनुमान चौक, डेक्कन जिमखाना, पुणे - ४११००४
सोम ते शनि - सकाळी १०:३० ते सायं. ७ वा.

भीष्म प्रकाशन
भीष्म स्कूल ऑफ इंडीक स्टडीज या संस्थेचे अधिकृत प्रकाशन
प्राचीन भारतातील ज्ञान, विज्ञान, साहित्य, संस्कृती, परंपरा, इतिहास, सभ्यता इ. भारतीय ज्ञान व्यवस्थांसंबंधी विविध विषयांवर अभ्यासपूर्वक संशोधनात्मक आणि संदर्भासहित पुस्तके प्रकाशित करणे हे भीष्म प्रकाशनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. भारताविषयीचे सुयोग्य आणि उदात्त कथन प्रस्थापित करणारे, सकारात्मक, बुद्धीला आणि विचारांना चालना देणारे प्रामाणिक साहित्य प्रकाशित करणे हे भीष्म प्रकाशनाचे कार्य आहे. याच बरोबर वर्तमान काळाबरोबर संलग्न भारत आणि संपूर्ण विश्व यांच्या संबंधी जिव्हाळ्याच्या आणि महत्त्वपूर्ण विषयांवरचे भाष्य प्रकाशित करणे आवश्यक आहे. वाचकांचे हित करते ते साहित्य… केवळ करमणूक करणारे, वेळ घालवण्यासाठी, बुद्धी भेद करणारे, गोंधळ उडवणारे असे विषय टाळून कृती प्रवण करणारे, प्रेरणादायी, सुस्पष्ट भाष्य करणारे लेखन प्रकाशित केले जाणे आवश्यक आहे. आज भारत जगामध्ये युवा देश म्हणून प्रसिद्ध आहे. विविध माध्यमांच्या सुळसुळाटाने युवक अनेकदा भ्रमित होऊन जातात असे दिसते. त्यांना दिशा देणारे, त्यांना जीवनमूल्यांविषयी, आदर्शांविषयी, जीवनाचे नियोजन करण्यासाठी, यशस्वी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करणारी पुस्तके प्रकाशित करावयाचे भीष्म प्रकाशनाने ठरवले आहेत. मराठी, हिंदी, आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये भीष्म प्रकाशन पुस्तके प्रकाशित करणार आहे.
प्रा. क्षितिज पाटुकले भीष्म प्रकाशनाचे प्रमुख मार्गदर्शक असून प्रा. अनिकेत पाटील हे व्यवस्थापकीय संचालक आहेत. विविध विषयांवरील मान्यवर तज्ञ, विद्वान आणि विचारवंत अशा मार्गदर्शकांचे समूह भीष्म प्रकाशनासाठी पुस्तक निवड, संपादन, मांडणी, प्रकाशन प्रक्रिया आणि वितरण यासाठी सहाय्य करीत आहेत. वाचकांनीही भीष्म प्रकाशनासाठी थेट पुस्तक विषय सुचविता येतील. ते वाचकांच्या प्रतिक्रियांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.